Saturday, February 20, 2021

Birthday Gift For Dabbang 3 Cameraman Devendra G

Devendra Gayakwad - Cameraman मित्राच्या वाढदिवसाला कुणी आवडत्या वस्तू, कपडे, केक, फुले, भेटकार्ड देतं, तर कुणी सरप्राईज पार्टी. पण जर कुणी आपल्या मित्राला वाढदिवसाला चक्क...
More

  Latest Posts

  Girlfriend marathi movie amay wagh and sai tamankar

  Girlfriend marathi movie

  सई – अमेयच्या ‘गर्लफ्रेंड’चा हटके टीजर प्रदर्शित

  ‘गर्लफ्रेंड’ मिळायला हवी राव! असे म्हणणाऱ्या नचिकेत प्रधान अर्थात अमेय वाघ याला त्याच्या आगामी ‘गर्लफ्रेंड’ या चित्रपटात अलिशा नावाची मुलगी भेटल्याचे चित्रपटाच्या पोस्टर आणि टीजर मधून दिसते. मात्र तीच त्याची ‘गर्लफ्रेंड’ होणार का? अशी उत्कंठा वाढवणारा चित्रपटाचा टीजर नुकताच प्रदर्शित करण्यात आला आहे. यामध्ये नचिकेत सिंगल असून त्याचा वाढदिवस १४ फेब्रुवारी म्हणजेच‘व्हेलेंटाईन डे’ च्या दिवशी असल्याचे दिसते, ‘गर्लफ्रेंड’ नसणे आणि ‘व्हेलेंटाईन डे’ ला बर्थडे असणे याचे दुःख नेमके काय असते हे एक सिंगल मुलगाच सांगू शकतो हे यातून दिसते.

  ह्यूज प्रॉडक्शन्स आणि प्रतिसाद प्रॉडक्शन्स प्रस्तुत ‘गर्लफ्रेंड’ च्या टीजरमध्ये अमेय आपल्या कुटुंबाबरोबर ‘१४ फेब्रुवारी’ला वाढदिवस साजरा करताना दिसतो. मुळात वाढदिवशी आनंदी होण्यापेक्षा आपलं वय वाढतंय आणि आपण अजूनही सिंगल आहोत, या विषयीचे शल्य त्याच्या मनात दिसते. त्यात कुटुंब, मित्र, ऑफिसमधील सहकारी आणि बॉसबरोबर असणारी त्याची केमेस्ट्री देखील इंटरेस्टिंगपद्धतीने समोर येते. या टीजर मध्ये सई अमेयला समजून घेण्याचा प्रयत्न करत “तुला कधीच गर्लफ्रेंड नव्हती?” असा प्रश्न विचारते. यामुळे अमेय मधील सिंगल तरुण अधिक भाऊक होऊन तिला मुलींना माझ्यासारखे ‘गुड बॉईज’ का आवडत नाहीत याचा पाढा वाचून दाखवतो. यामुळे सई आणि अमेय मध्ये नक्क्की काय केमिस्ट्री या चित्रपटात जुळलेली असणार याची उत्कंठा हा टीजर वाढवतो.

  ‘गर्लफ्रेंड’चे लेखन, दिग्दर्शन उपेंद्र सिधये यांनी केले असून चित्रपटाची निर्मिती अनिश जोग आणि रणजीत गुगळे यांनी केली आहे. या चित्रपटात अमेय वाघ आणि सई ताम्हणकर यांच्यासह सागर देशमुख, इशा केसकर, रसिका सुनील, सुयोग गोऱ्हे, यतीन कार्येकर, कविता लाड, उदय नेने अशी तगडी स्टारकास्ट बघायला मिळणार आहे. टीझरच्या शेवटी अमेय आणि सई पावसात स्तब्ध थांबत एकमेकांकडे बघत मिश्कीलपणे हसताना दिसतात. आता या हास्याचे रहस्य काय हे जाणून घेण्यासाठी २६ जुलै २०१९ पर्यंत वाट पाहावी लागणार आहे.

  Girfriend In Cinemas 26th July.

  Leave your vote

  Latest Posts

  Don't Miss

  Stay in touch

  To be updated with all the latest news, offers and special announcements.

  Log In

  Forgot password?

  Forgot password?

  Enter your account data and we will send you a link to reset your password.

  Your password reset link appears to be invalid or expired.

  Log in

  Privacy Policy

  Add to Collection

  No Collections

  Here you'll find all collections you've created before.