Jawani Zindabad, a Story Based on True life Incidents.
Cast : Cast: Abhishek Sathe, Ketaki Narayan, Yateen Karyekar, Asawari Joshi, Manasi Naik
Banners : Maharashtra Motion Pictures & MK Entertainment
Producer: Nitin Uttamrao Sathe
Co-Producer: Narendra Chandrakant Yadav (Patil)
Writer & Director: Shiv Kadam
DoP: Karan Tandale
सळसळता उत्साह म्हणजे तरुणाई. ‘जवानी झिंदाबाद’ या चित्रपटाचा युथफुल ट्रेलर नुकताच सोशल मीडियावर प्रदर्शित करण्यात आला आहे. महाराष्ट्र मोशन पिक्चर्स व एम के एंटरटेनमेंट प्रस्तूत ‘जवानी झिंदाबाद’ या चित्रपटाचे दिग्दर्शन शिव कदम यांनी केले आहे. या चित्रपटातून अभिषेक साठेचे मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण होत आहे, केतकी नारायण नायिकेच्या भूमिकेत आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने अभिषेक आणि केतकी ही फ्रेश जोडी प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.
आजच्या तरुणाईचे प्रतिबिंब असलेल्या ‘जवानी झिंदाबाद’ या चित्रपटाची निर्मिती नितीन उत्तमराव साठे यांनी केली असून सहनिर्माता नरेंद्र चंद्रकांत यादव (पाटील) आहेत. एका सत्य घटनेवर आधारित या चित्रपटात एक हटके अशी हृदयस्पर्शी प्रेमकथा बघायला मिळणार आहे. मनोरंजना बरोबरच यातून एका सामाजिक संदेश देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. या चित्रपटात अभिषेक साठे आणि केतकी नारायण यांच्यासह यतीन कार्येकर, आसावरी जोशी, मधू कांबीकर, पूर्वा शिंदे, सचीन गवळी, अभ्यंग कुवळेकर यांच्या महत्वपूर्ण भूमिका असल्याचे ट्रेलर मध्ये दिसते.
‘जवानी झिंदाबाद’ ची कथा नितीन उत्तमराव साठे यांची आहे, तर पटकथा आणि दिग्दर्शन शिव कदम यांचे आहे. छायांकन करण तांदळे यांनी आणि कलादिग्दर्शन वासू पाटील यांनी केले आहे. या चित्रपटाला कृणाल देशमुख आणि साहील कुलकर्णी यांनी संगीतबद्ध केले असून चित्रपटाची गाणी महाविद्यालयीन युवा पिढीच्या मनाला भावतील अशी आहेत. आदर्श शिंदे, स्वप्नील बांदोडकर, जसराज जोशी, हृषीकेश रानडे, सावनी रविंद्र, जुईली जोगळेकर, दिपांशी नागर यांचा स्वर चित्रपटातील गाण्यांना लाभला आहे. अभिषेक साठे आणि केतकी नारायण यांच्यातील पडद्यावर दिसणाऱ्या ऑनस्क्रीन केमिस्ट्रीमुळे हा ट्रेलर अधिक लक्ष वेधून घेतो. एका संवेदनशील विषयावर हटके अंदाजात भाष्य करणारा ‘जवानी झिंदाबाद’ हा चित्रपट येत्या १३ डिसेंबर रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे.