Sunday, February 21, 2021

Birthday Gift For Dabbang 3 Cameraman Devendra G

Devendra Gayakwad - Cameraman मित्राच्या वाढदिवसाला कुणी आवडत्या वस्तू, कपडे, केक, फुले, भेटकार्ड देतं, तर कुणी सरप्राईज पार्टी. पण जर कुणी आपल्या मित्राला वाढदिवसाला चक्क...
More

  Latest Posts

  Readymix Marathi Movie | Vaibhav Tatwawaadi,Prarthana Behere | 8 Feb 2019

  Readymix Marathi Movie

  Readymix Marathi Movie
             Readymix Marathi Movie

  Movie:- Readymix (8 Feb 2019)

  Movie Casts:- Vaibhav Tatwawaadi, Prarthana Behere,Neha Joshi and Asha Patil
  Produced By:-Prashant Ghaisas & Sunil Vasant Bhosale
  Presented By:- Ameya Vinod Khopkar in association with Kruti Films & Someel Creations
  Directed By:- Jalinder Kumbhar

  Music on Zee Music Company Marathi.

  Readymix Movie Official Trailer

  February is a special month for lovers. This month there is Valentine’s Day, because of the youthfulness of the youth. This special feature of this month will be the upcoming film ‘Readymix’, based on the love of actor Vaibhav Tatwawaadi and Prarthana Behere. The audience also gave a spontaneous response to this trailer.

  Readymix marathi movie

  कॉमेडी आणि रोमान्सचं रेडीमिक्स काँबीनेशन

  अमेय विनोद खोपकर यांच्या ‘एव्हीके फिल्म्स’ प्रस्तुत, ‘कृती फिल्म्स’, ‘सोमिल क्रिएशन्स’ निर्मित आणि शेखर ढवळीकर लिखित ‘रेडीमिक्स’ हा कॉमेडी आणि रोमान्सचं मजेदार ‘रेडीमिक्स’ काँबीनेशन असलेला चित्रपट येत्या ८ फेब्रुवारी रोजी सर्वत्र प्रदर्शित होत आहे. तरुणाईला भुरळ घालणाऱ्या या रोमांटिक चित्रपटाचं दिग्दर्शन युवा दिग्दर्शक जालिंदर कुंभार यांनी केलं आहे. मालिकांच्या लिखाण – दिग्दर्शनात व्यस्त असलेल्या जालिंदर यांच्याशब्दात ‘रेडीमिक्स’ची गाथा.

  रेडीमिक्स सिनेमांत असं काय आहे जे इतर सिनेमांत नाही?

  उत्तर : कॉमेडी आणि रोमान्स यांचं काँबीनेशन असलेली एक सुंदर कथा प्रेक्षकांना ‘रेडीमिक्स’मध्ये पहायला मिळेल. आपल्या धकाधकीच्या जीवनात काही क्षण जर आपल्याला एखादी छानशी गोष्ट पहायला मिळाली आणि सोबत वैभव, नेहा आणि प्रार्थना यांच्यासारखे मनोरंजन करणारे कलाकार असतील तर सिनेमा मस्त एन्जॉय करता येईल.

  रेडीमिक्स कथेतला कोणता विशेष गुण भावाला?

  उत्तर : लेखक शेखर ढवळीकर हे आमच्याकडे रेडीमिक्सची कथा घेऊन आले. मला त्यातलं सगळ्यात जास्त काही आवडलं असेल तर ते म्हणजे आजच्या काळातील व्यक्तिरेखा आणि त्यांच्यात घडणारी एक छानशी गोष्ट.

  प्रार्थना – वैभव ही जोडी लोकप्रिय आहे म्हणून निवडली कि दुसरं कोणी डोळ्यासमोर येईनात म्हणून.

  उत्तर : वैभव, प्रार्थना आणि नेहा हे तिघेही सिनेमातील व्यक्तिरेखांसारखेच वाटत असल्याने / व्यक्तिरेखांना अनुरूप असल्याने त्यांना निवडले.

  सावित्रीच्या लेकी नंतर रेडीमिक्सचं धाडस करण्यासाठी जवळपास एक तप का?

  उत्तर : आम्ही चांगली स्टोरी शोधत होतो. दरम्यान अनुबंध, लज्जा, कालाय तस्मय नमः, मधू इथे चंद्र तिथे आणि शेवटी ‘का रे दुरावा’ ही मी लिहिलेली आणि दिग्दर्शित केलेली मालिका अशा टिव्हीवर चाललेल्या नवनवीन विषयांवर लेखन आणि दिग्दर्शन करण्यात मी व्यस्त होतो. तेही खूप अव्हानात्मकच काम होते. दरम्यात मला आणि निर्मात्यांना तशी चांगली गोष्ट मिळत न्हवती. शेखरने जेव्हा स्टोरी ऐकवली तेव्हा आम्हाला सगळ्यांनाच ती एकदम आवडली.

  नाते संबंधाकडे तुमच्या कलाकृतींचं झुकतं माप दिसतं यामागे काही विशेष आहे का?

  उत्तर : उलट आहे खरं तर. कलाकृती कशीही असली तरी त्यातील व्यक्तिरेखांमधील नात्यांना मी जरा जास्तच एक्सप्लोर करतो. त्याने कथा एका वेगळ्याच पातळीवर येऊन पोहोचते.

  रेडीमिक्स करताना मालिका आणि चित्रपट दोन्हीचा अनुभव मिक्स झालाय का?

  उत्तर : नाही नाही, कामाच्या बाबतीत नेमकं काय सांगायचं आहे आणि कसं सांगायचं आहे याबाबतची स्पष्टता मला नक्की असते. मालिका आणि चित्रपट दोन्ही माध्यमातून खूप काही शिकता आलं जे दोन्ही माध्यमात काम करताना फायद्याचं ठरतं.

  जालिंदरचं आवडत माध्यम कुठलं? आणि का?

  उत्तर : सिनेमा. कारण माझ्या मनात असलेल्या कथा मला सिनेमातून सांगता येतात.

  कॉलेजातून नुकतंच बाहेर पडून नोकरी धंदा करणऱ्या तरुणाईकडे तुम्ही कसं पाहताय?

  उत्तर : कॉलेजमधून बाहेर पडलेली आजची मुलं ही खूप सॉर्टेड आहेत. नक्की काय करायचं आहे आणि कसं करायचं आहे याबाबतीतला रोडमॅप त्यांच्याकडे तयार असतो. त्यांना मदत करणं हे अनुभवी आणि वयस्कर नागरिकांचं काम आहे. पण त्यांना घाबरवण्यात येतं. नाऊमेद करण्यात येतं हे चूक आहे.

  चित्रपटाच्या एकूण दर्जा आणि सौंदर्य वेगळा आहे, ते आणण्यासाठी विशेष काय करावं लागलं?

  उत्तर : चित्रपटातील फ्रेशनेस, ताजेपणा दिसायला हवा, अनुभवायला हवा म्हणून प्रयत्न करण्यात आला. गायक तरुण आणि नवीन घेण्यात आले, म्युझिक त्या पद्धतीने करण्यात आलं. कॅमेरा, लाईट्स, कपडे आणि मेकअप, लोकेशन्स या सगळ्यात बाबतीत ताजेपणा जपायचा प्रयत्न करण्यात आला.

  दादा कोंडकेंच्या आईची भूमिका गाजवणाऱ्या आशा पाटीलांची शेवटची भूमिका

  Asha patil in Readymix marathi movie

  मराठी चित्रपटांमधून खानदानी मराठमोळ्या स्त्रीची व्यक्तिरेखा साकारणाऱ्या आणिअनेक चित्रपटांमध्ये सुपरस्टार दादा कोंडकेंच्या आईच्या भूमिकेमुळे अजरामरझालेल्या ज्येष्ठ चरित्र अभिनेत्री आशा पाटील यांचा ‘रेड़ीमिक्स’ हा अखेरचा चित्रपट येत्या ८ फेब्रुवारीला प्रदर्शित होतोय. ‘सामना’, ‘तुमचं आमचं जमलं’, ‘राम राम गंगाराम’, ‘बन्याबापू’, ‘माहेरची साडी’, अशा जवळपास दिडशेहून अधिक हिंदी मराठी चित्रपटांमधून चरित्र अभिनेत्रीची भुमका साकारणाऱ्या आशा पाटील यांचा नुकताच स्मृतीदिन होऊन गेला. ‘सालस आणि सरळ स्वभावाच्या आशाताईंनी अनेक चित्रपटांमध्ये खानदानी मराठमोळ्या महिलेच्या व्यक्तिरेखा साकारल्या.त्यांच्या अस्सल बावन्नखणी अभिनयासोबतच रुबाबदार व्यक्तित्वामुळे त्या उठून दिसायच्या.

  या चतुरस्त्र अभिनेत्रीचा अमेय विनोद खोपकर यांच्या ‘एव्हीके फिल्म्स’, प्रशांत घैसास यांच्या ‘कृती फिल्म्स’, आणि सुनिल वसंत भोसले यांच्या ‘सोमिल क्रिएशन्स’चा जालिंदर कुंभार दिग्दर्शित‘रेडीमिक्स’ हा त्यांचा अखेरचा चित्रपट आहे. वयाच्या ८० व्या वर्षी त्यांनी या चित्रपट केलेली ही भूमिका रसिकांची दाद मिळवीत विशेष स्मरणात राहणारी असल्याचे निर्माता-दिग्दर्शकांचे म्हणणे आहे.

  १९६० मध्ये माधव शिंदे दिग्दर्शित ‘अंतरिचा दिवा’ या चित्रपटातील भूमिकेने मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण करणाऱ्या आशा पाटील यांनी अभिनयाच्या जोरावर चित्रपटसृष्टीत स्वतःचे वेगळे अस्तित्व निर्माण केले होते. मूळच्या रुकडी(ता.हातकणंगले) येथील आशाताईंनी १५० हून अधिक मराठी आणि हिंदी चित्रपटांमध्येअभिनय केला आहे. ‘भालजी पेंढारकरांच्या ‘साधी माणसं’ चित्रपटातही त्यांनी कामकेले होते.तसेच ‘कामापुरता मामा’, ‘सामना’, ‘तुमचं आमचं जमलं’, ‘बन्याबापू’, राम राम गंगाराम’, ‘चांडाळ चौकडी’, ‘सुळावरची पोळी’, ‘मंत्र्यांची सून’, ‘आयत्या बिळावर’, ‘गावरान गंगू’, ‘उतावळा नवरा’, ‘शुभ बोल नाऱ्या’, ‘माहेरची साडी’ ते ‘ह्य़दयस्पर्शी’, ‘घे भरारी’ अशा असंख्य चित्रपटांमधून त्यांनी चरित्र भूमिका केल्या. दादा कोंडकेंच्या चित्रपटांमधून त्यांच्या आईच्या भूमिकेत असलेल्या आशा पाटील यांचा कणखरपणा रसिकांना विशेष भावाला आहे. दादांसोबातच त्यांनी डॉ. काशीनाथ घाणेकर, लक्ष्मीकांत बेर्डे, आशोक सराफ, विक्रम गोखले, अलका कुबल, प्रिया
  अरुण, वर्षा उसगावकर अशा आघाडीच्या कलाकारांसोबत काम केले होते. ‘रेडीमिक्स’मुळे त्यांना आजच्या पिढीतील वैभव तत्ववादी, प्रार्थना बेहेरे, नेहा जोशी या कलावंतांसोबातही काम करता आले आहे.

  जालिंदर कुंभार दिग्दर्शित ‘रेडीमिक्स’मधील आशा पाटील यांच्या निवडीचे श्रेय या चित्रपटाचे कार्यकारी निर्माते प्रवी वानखेडे यांना जाते. त्यांच्या विशेष प्रयत्नामुळेच या चित्रपटात प्रेक्षकांना आशाताईंचे दर्शन झाले आहे. प्रवीण वानखेडे त्यांच्याशी कायम संपर्कात होते. हलाखीच्या परिस्थितीमुळे आशाताई कोल्हापुरात एका वृद्धाश्रमात राहत होत्या. त्यांना आपल्या घरात राहता यावे याकरिता काही मंडळी प्रयत्न करीत होती त्यात प्रवीण वानखेडेही होते. कौटुंबिकदृष्ट्या काहीसा खडतर प्रवास करावा लागलेल्या आशाताईंना अखेरची दीड वर्षे कोल्हापुरातील मातोश्री वृद्धाश्रमात राहावे लागले.

  मणका आणि किडनीच्या त्रासान त्रस्तअसल्यामुळे इच्छा असूनही त्या चित्रपटांमध्ये काम करू शकत नव्हत्या. प्रवीणने
  ही गोष्ट दिग्दर्शक जालिंदर कुंभार, आणि निर्माते प्रशांत घैसास, सुनील भोसले यांच्या कानावर घालून त्यांना चित्रपटात योग्य भूमिका असल्यास द्यावी, बाकी सगळी व्यवस्था मी पाहिन असे सांगितले. आशाताई पाटील आपल्या चित्रपटाद्वारे प्रेक्षकांना दिसणार ही गोष्ट तसेच प्रवीण यांची तळमळ पाहून सगळ्यांनी होकार दिला आणि त्यांचे ‘रेडीमिक्स’ मध्ये असणे पक्के झाले. त्यांच्यासाठी प्रवीणने चोख व्यवस्था उभी केली. या चित्रपटात त्यांनी वैभव तत्ववादी यांच्या आजीचं काम केलं आहे. चित्रपट त्यांच्यासोबत काम करणं हे सगळ्यांसाठीच भाग्याचं होत.त्यांच्यासोबतच्या आठवणी खूप काही शिकवून गेल्या. त्यांच्यासोबत काम करण्याचीसंधी म्हणजे ही एक ईश्वरी देणगी होती आणि तो अनुभव कार्यकारी निर्माते प्रवीण वानखेडे यांच्यामुळे शक्य झाला. येत्या ८ फेब्रुवारी पासून हा अनुभव त्यांच्याचाहत्यांनाही चित्रपटगृहात अनुभवता येईल.

  *अवघ्या चित्रपटसृष्टीची **‘**आई**’** ‘रेडीमिक्स’द्वारे ‘आजी’ म्हणून लक्षातराहतील.*

  आशाताई पाटील अवघ्या मराठी चित्रपट सृष्टीत आई म्हणूनच ओळखल्या जातहोत्या. ‘रेडीमिक्स’ मधील भूमिकेमुळे आजी म्हणूनही लक्षात राहतील. उत्स्फूर्त अभिनय आणि लक्ष्यवेधी संवादफेकीमुळे त्यांच्या भूमिका सहजसुंदर वाटायच्या. ज्या पद्धतीने त्या चित्रपटातील सोज्वळ आणि प्रेमळ आईची भूमिका साकारत त्याच पद्धतीने त्या स्वतःच्या वैयक्तिक आयुष्यातही जगत होत्या.

  जनसंपर्क प्रमुख : राम कोंडीलकर

   

  Leave your vote

  Latest Posts

  Don't Miss

  Stay in touch

  To be updated with all the latest news, offers and special announcements.

  Log In

  Forgot password?

  Forgot password?

  Enter your account data and we will send you a link to reset your password.

  Your password reset link appears to be invalid or expired.

  Log in

  Privacy Policy

  Add to Collection

  No Collections

  Here you'll find all collections you've created before.