Tula Pahate Re
TV Serial : Tula Pahate Re | तुला पाहते रे
Also Known As : Tula Pahate Re Zee Marathi Serial
Producer : Atul Ketkar and Aparna Ketkar
Director : Girish Mohite
Production House : Right Click Media Solutions
StarCast :
Subodh Bhave as Vikram Saranjame,Gayatri Datar as Isha,Abhidnya Bhave as Mayara, Sonal Pawar as Rupali
स्टोरी: तुला पहते रे हा सुबोध भावे आणि गायत्री दातार यांची भूमिका असलेला एक मराठी रोमँटिक नाटक टेलिव्हिजन शो आहे. ते वेगवेगळ्या जगाचे आहेत, ते वेगवेगळ्या पार्श्वभूमीतून आणि दोन भिन्न दशकापासून आहेत. हे जोडपे सिद्ध करतील की जेव्हा दोन आत्मा एकमेकांना उद्देशून असतात, तेव्हा दोघेही दोन युगांच्या संबंधातही भेटू शकतात!
झी मराठीवरील ‘तुला पाहते रे’ मालिकेने अल्पावधीतच प्रेक्षकांची पसंती मिळवली आणि टी.आर.पी.चे उच्चांक देखील गाठले. अभिनेता सुबोध भावेने या मालिकेतून छोट्या पडद्यावर पुनरागमन केलंय तसेच नवोदित अभिनेत्री गायत्री दातारसह त्यांच्या जोडीला प्रेक्षकांचेही भरपूर प्रेम मिळतंय. ‘विक्रांत’ आणि ‘ईशा’ यांच्या भूमिकांभोवती जरी या मालिकेची कथा फिरत असली, तरी ईशाची आई सौ. निमकर यांचीही भूमिका तेवढ्याच ताकदीची आहे. मात्र, ईशाच्या आईची भूमिका साकारणारी ही अभिनेत्री कोण आहे माहिती आहे का?
‘तुला पाहते रे’ मालिकेत ईशाच्या आईची भूमिका साकारणाऱ्या या अभिनेत्रीचे नाव आहे ‘गार्गी फुले-थत्ते’. गार्गी फुले या मराठी चित्रपटसृष्टीचे लाडके आणि दिग्गज अभिनेते निळू फुले यांची कन्या आहेत.
छोट्या पडद्यावर विविध मालिका रसिकांचं मनोरंजन करतात. या मालिकांमधून घराघरात घडणाऱ्या घडमोडी दाखवल्या जातात. त्यामुळे या मालिकांसोबत रसिकांचं वेगळं नातं निर्माण होतं. मालिकेत घडणाऱ्या घडामोडी जणू काही आपल्या आजूबाजूला सुरू आहेत असं रसिकांना वाटतं. त्यामुळे या मालिका रसिकांच्या पसंतीस पात्र ठरतात. यात ‘तुला पाहते रे’ ही मालिका सध्या तुफान गाजतेय. ही मालिका सुरू झाल्यानंतर अवघ्या काही दिवसांमध्येच या मालिकेने प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. बार्क म्हणजेच ब्रॉडकास्ट ऑडियन्स रिसर्च काऊन्सिल इंडियाने या आठवड्यात कोणत्या मालिका प्रेक्षकांनी अधिक पाहिल्या याचा रिपोर्ट दिला आहे.